Maharashtra Police Bharti Physical Test 50 Marks

 Maharashtra Police Bharti Physical Test 50 Marks|महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ५० गुणांची 

police bharti syllabus 2022 police bharti information marathi police bharti physical details police bharti ground information

नमस्कार मित्रांनो!

                        आमच्या mpscstudymaterial.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागा कडुन  Maharashtra Police Bharti 2022 पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी संदर्भात जि.आर. प्रसिद्ध केले असून त्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता नियम करण्यात आले आहेत. ते आपण सविस्तर पाहु. 

Police Bharti Physical test update information:-

Police Bharti 2022 Physical Test शारीरिक चाचणी (५० गुण):-

                        मित्रांनो यामध्ये जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारिरीक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्य असेल. 

पुरुषांकरिता शारीरिक चाचणी Physical Test खाली तक्त्याप्रमाणे एकुण ५० गुणाची असेल.

(अ)

पुरुष उमेदवार 

गुण 

(क)

१६०० मीटर धावणे..

२० 

(ख)

१०० मीटर धावणे 

१५ 

(ग)

गोळाफेक 

१५ 

 

एकुण 

५० 

वर शारीरिक चाचणी ही पुरुषांकरिता असून महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी खाली तक्त्याप्रमाणे पाहु या.

(ब)

महिला  उमेदवार 

गुण 

(क)

८००  मीटर धावणे..

२० 

(ख)

१०० मीटर धावणे 

१५ 

(ग)

गोळाफेक 

१५ 


एकुण 

५० 

Maharashtra Police Bharti Written test udate infermation :-

Written Test लेखी चाचणी (१०० गुण):-
                मित्रांनो या मध्ये (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलवण्यास पात्र असतील. 
                (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :-
                (१) अंकगणित ;
                (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
                (३) बुद्धिमत्ता चाचणी ;
                (४) मराठी व्याकरण. 
                (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहूपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनटे इतका असेल. 
                (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. 

Maharashtra Police Bharti 2022 New GR Explanation:-

स्पष्टीकरण:- शारीरिक योग्यता किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलविण्यास पात्र असतील. उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गामद्धे १० रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गामद्धे ५ रिक्त पदे असतील तर, अनुसूचित जाती प्रवर्गामद्धे गुणवत्तेनुसार १०० (१० x  १० =१००) उमेदवार, सूचीबद्ध करण्यात येतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामद्धे गुणवततेनुसार ५०(१० x ५ = ५०) उमेदवार, सूचीबद्ध करण्यात येतील. तथापि, अनुसूचित जाती प्रवर्गामधील गुणानुक्रमे १०० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेल्या गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गामधील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचीत जाती प्रवर्गांतर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. 
(३) पोलिस महासंचालक यांनी प्रत्येक पोलिस घटकासाठी गठित केलेले निवड मंडळ, या नियमाचे पोट नियम (१) व (२) मध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार करील. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, गृह विभाग, शासन निर्णय, क्रमांक-पोलिस-१८१९/प्र. क्र.३१६/पोल-५अ, दि. १० डिसेंबर २०२० मध्ये आणि त्यानंतरच्या शासनाने वेळोवेळी काढलेल्या कोणत्याही आदेशानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार कण्यारत येईल."

असे मित्रांनो या GR मध्ये नमूद आहे. तर मित्रांनो या GR  प्रमाणे आपण Maharashtra Police Bharti ची तयारी करायला हवी

  

मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे राजपत्र खाली दिलेल्या लिंक वरुण आपण download सुद्धा करू शकता. 

  महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ शारीरिक चाचणी वेळापत्रक दर्शविणारा तक्ता 

Maharashtra Police Bharti 2022 1600 Miter Runing Time Table

 

 

 

 

 

१६०० मीटर धावणे

वेळ पासून  

वेळ पर्यंत 

गुण 

0५ .१०  च्या आत 

२० गुण 

0५.१० 

0५.३०

१५ गुण 

0५.३०

0५ .५०

१२ गुण 

0५.५० 

0६.१०

१० गुण 

0६.१०

0६.३०

०८ गुण 

०६.३० 

          ०६.५० 

०४ गुण 

६.५० च्या पुढे

00 गुण


Maharashtra Police Bharti 2022 100 Miter Running Time Table

 

 

 

 

 

१०० मीटर धावणे

वेळ पासून  

वेळ पर्यन्त 

गुण 

११.५०   च्या आत 

१५ गुण 

११.५०

१२.५०

१२ गुण 

१२.५०

१३.५०

०९ गुण  

१३.५०

१४.५०

०६ गुण 

१४.५०

१५.५०

०३ गुण  

१५.५० च्या पुढे

00 गुण


Maharashtra Police Bharti 2022 Shot-Put Time Table (गोळा फेक)

 

 

 

 

 

 गोळा फेक

मिटर  पासून  

मिटर पर्यन्त 

गुण 

०८.५०   च्या आत 

१५ गुण

०८.५०

०७.९० 

१२ गुण

०७.९० 

०७.४० 

०९ गुण  

०७.४०

०६.९० 

०६ गुण 

०६.९० 

०६.४० 

०३ गुण  

०६.४० पेक्षा कमी 

00 गुण

 



Post a Comment

0 Comments